उपवासाचे पदार्थ - श्रावण स्पेशल
शिंगाडयाच्या पिठाचा ढोकळा
साहित्य :
२ वाट्या शिंगाड्याचे पीठ, १ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट, २ वाट्या आंबटसर ताक
मीठ, मिरची, कोथिम्बिर , जिरे, मोहरी , खायचा सोडा
कृती :
- सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे.
- २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे.
- नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १/२ तास वाफवून घ्यावे.
- जरा थंड झाल्यानंतर वड्या कापाव्यात. वरती थोडेसे ओले खोबरे व
- कोथिंबीर घालावी. वरून मोहरीची फोडणी घालावी.
वरई उत्तपा उपवासाचे उत्तप्पे
साहित्य :
एक वाटी वरईचे तांदूळ, पाव वाटी साबूदाणा, अर्धी वाटी खवलेले खोबरे, एक चमचा जिरे, मीठ,
दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तीन चमचे खोबर्याचे काप व काजूतुकडे. तेल.
कृती :
- सर्वप्रथम वरई तांदूळ व साबूदाणा ताकात रात्री भिजत घालावा.
- दुसर्या दिवशी सकाळी मिश्रणात तखवलेले कोबरे घालून मिक्सीतून बारीक करून घ्यावे.
- निर्लेप तव्यावर जर जाडसर छोटे उत्तपे पसरून घालावेत.
- त्यावर खोबर्याचे काप, हिरव्या मिरचीचे तुकडे व काजूचे तुकडे पेरावेत.
- झाकण ठेवून उत्तपा पूर्ण शिजू द्यावा.
साबुदाणा वडा
साहित्य :
२ वाटया साबुदाणा, १ वाटी दाण्याचे कूट, ३-४ छोटे उकडलेले बटाटे
हिरवी मिरची बारीक चिरलेली / वाटलेली , जीर, वडे तळण्यासाठी तेल
मीठ चवीनुसार
कृती :
- साबुदाणा ४-५ तास भिजत ठेवावा मऊ झाला पाहिजे.
- उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे. मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
- भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचा कूट,
- आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
- मिश्राणाचे लिंबा एवढे गोळे बनवून थापून घ्यावे. तेलात वेडे तळून घ्यावेत.
- गोड दह्या किंवा नारळाच्या चटणीबरोबर गरम गरम वडे खूप छान लागतात.
साबुदाणा खिचडी
साहित्य :
साबुदाणा, दाण्याचे कुट, १ -२ बटाटा उकडून, १ मिरची, मीठ , तूप
कृती :
- साबुदाणा साधारणत: ३-४ तास भिजवून घ्यावा.
- कढईत तूप घालून त्यात जिरे,मिरची ची फोडणी करावी.
- नंतर बटाट्याच्या लहान लहान फोडी करून त्यात घालावे व नीट परतून घ्यावे.
- मग साबुदाणा, मीठ, दाण्याचे कुट घालून एकत्र करावे. मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी. नीट परतून घ्यावे
- खिचडी तयार …।
साबुदाणा खीर
साहित्य :
१/२ कप साबुदाणा, १/४ कप साखर, २ कप दुध, १ टेबलस्पून काजूचे तुकडे
१ टेबलस्पून बेदाणे, चिमुटभर केशर, १/४ टीस्पून वेलची पूड, १ टीस्पून तूप
कृती :
- साबुदाणा २-३ वेळा स्वच्छ धुवून ४-५ तास भिजवून ठेवा.
- १ कप दुध उकळत ठेवा. दुध उकळले कि त्यात साबुदाणा घाला. साबुदाणा अर्धवट शिजला असे वाटले कि, उरलेले दुध घाला.
- आणि साबुदाणा पूर्ण शिजेपर्यंत उकळत ठेवा. साबुदाणा तरंगायला लागला याचा अर्थ शिजला आहे.
- मग त्यात साखर,वेलची पूड आणि केशर घाला. मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवत ठेवा.
- दुसरीकडे एका छोट्या पातेलीत तूप गरम करा. त्यात काजू आणि बेदाणे गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या
- आणि मग उरलेल्या तुपासकट खिरीत घालून ढवळून घ्या .
- मग सर्व्ह करा.
0 Comments