Break Fast - न्याहारी
मिसळ पाव
साहित्य :
पाव किलो मोड आणून शिजवलेली मटकी, दोन उकळलेले बटाटे, तीन कांदे, दोन टोमॅटो, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, एक वाटी खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, हिंग, लिंबू, मोहरी, हळद, कढीपत्ता, मीठ, तेल, फरसाण.
- मोड आलेली मटकी भाजून घ्या.
- कढईत तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट टाका.
- अता चिरलेले बटाटे, टोमॅटो टाका. खवलेले नारळ घालून परता.
- त्यानंतर मटकी टाका. गरम पाणी टाकून गरम मसाला घाला.
- वरून कोथिंबीर, कांदा, लिंबू व फरसाण टाकून पावसोबत सर्व्ह करा.
बर्गर
साहित्य :
बटाटे, गाजर, हिरवा वाटाणा, बर्गर बन, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स, तेल, गाजर, कांदा, चीज स्लाईस, टोमॅटो सॉस, आमचूर पावडर.
कृती :
- प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. त्याचप्रमाणे गाजर आणि मटारही उकडून घ्यावा.
- बटाटे कुस्करून घ्यावेत आणि त्यात कॉनफ्लॉवर, आमचूर पावडर, मीठ, मटार, गाजर आणि ब्रेड क्रम्स घालावे.
- या सर्व मिश्रणाचे गोल गोळे करून घ्यावेत. आणि हे गोळे डीप फ्राय करून घ्यावेत.
- बर्गर बनवर केचअप लावून घ्यावा आणि त्यावर काकडी आणि कांद्याच्या चकत्या लावाव्यात.
- त्यानंतर बटाटय़ाच्या स्लाईसही त्यावर ठेवाव्यात. त्यानंतर चीज स्लाईस ठेवून डीप फ्राय केलेले गोळा त्यात घालावा.
- हा घरगुती बर्गर खाण्यास तयार.
बटाटा शेवपुरी
- सर्वप्रथम रात्री पांढरे वाटाणे चिमूटभर सोडा घालून पाण्यात भिजत घालावे.
- सकाळी त्यात मीठ घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. हिरव्या मिरचीचा ठेचा करून त्यात घाला.
- पाणीपुरीच्या पुर्या थोड्या कुस्करून घ्या.
- त्यावर उकळलेल्या बटाट्याच्या छोट्या फोडी, दही, तिखट व गोड चटणी घाला.
- सर्वात नंतर त्यावर बारीक शेव घाला व सर्व्ह करताना कोथिंबीरीने सजवून द्या.
व्हेज मनचुरिअन
साहित्य :
भज्यांसाठी- १ वाटी किसलेला कोबी, १ वाटी किसलेली गाजरे, १ टे स्पून आलं मिरची लसूण पेस्ट, १टीस्पून सोया सॉस, प्रत्येकी १.५ ते २ टे स्पून मैदा व कॉर्नफ्लोअर, मीठ, अजिनोमोटो चवीनुसार, १/२ वाटी भात(शिळा असल्यास उत्तम) व तळणीसाठी तेल
ग्रेव्ही साहित्य :
७/८ लसूण पाकळ्या, बोटभर आलं, ४/ ५ हिरव्या मिरच्या:सर्व बारीक चिरून, १टी स्पून मिरपूड ,१टेस्पून साखर, १ ते १.५ टे स्पून सोया सॉस, २ टे स्पून कॉर्न फ्लोअर, २कांदापाती बारीक चिरून, १कप पाणी, मीठ, अजिनोमोटो चवीनुसार, १ लहान कांदा, १ लहान सिमला मिरची लाल किवा हिरवी.
कृती :
- सर्वप्रथम कोबी, गाजर एकत्र करणे. मैदा+कॉर्नफ्लोअर त्यात घालणे.
- आलं, लसूण मिरची पेस्ट घालणे, सोयासॉस घालणे, मीठ आणि अजिनोमोटो चवीनुसार घालणे.
- सोया सॉस मध्ये मीठ असते आणि अजिनोमोटोही खारट त्यामुळे मीठ घालताना ते लक्षात ठेवावे.
- सगळे एकत्र करणे, भात घालणे आणि मळणे. गोळे करणे आणि सोनेरी रंगावर तळून काढणे.
- कांदा आणि सिमला मिरची बारीक चौकोनी चिरणे. तेल गरम करून त्यावर कांदा, सि.मिरची परतून घेणे.
- आलं, लसूण, हिरव्या मिरच्या यांचे तुकडे त्यावर घालणे, परतणे. साखर, मीठ, मिरपूड, अजिनोमोटो, सोयासॉस घालून परतणे.
- कॉर्न फ्लोअरची अगदी थोड्या पाण्यात पेस्ट करून घेणे ती त्यात घालणे. कपभर पाणी घालून सारखे करणे. ४ ते ५ मिनिटे शिजवणे.
- कांदापात बारीक चिरून घालणे. सर्व्ह करायच्या आधी १०,१५ मिनिटे ग्रेव्हीत भजी घालणे.
व्हेज लोलीपोप
- सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्याचे छोटे अंडाकृती गोळे बनवावेत.
- आइस्क्रीमचे लाकडी चमचे किंवा सूप स्टिक मोडून त्यावर हे गोळे टोचावे.
- आणि तळून घ्यावे. जेणे करुन लाल रंग आल्यावर ते बाहेर काढावेत.
- थोडे गार झाल्यावर टोमॅटो सॉसबराबर मुलांना खाण्यास द्यावे.
झटपट रवा डोसा
- डोसे करायच्या आधी २ तास १ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, १ वाटी मैदा, १ वाटी आंबट दही घालुन सरसरीत भिजवावे.
- त्यात २ टेबलस्पून कडकडीत तेल व चवीला मिठ घालावे.
- डोशाकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून चटणीबरोबर खाण्यास द्यावा.
ब्रेड कटलेट
- पिठ्ठी मध्ये मीठा सहित सर्व सामग्री चांगल्या तऱ्हेने मिळवावी.
- ब्रेड चे त्रिकोणी तुकडे आणि दोन तुकड्यांच्या मध्ये मसालेदार पिट्ठी भरावी.
- एका भांड्यात बेसनास घट्ट भिजवावे त्यात एक चुटकी मिरची, चवीनुसार मीठ आणि चुटकी भर खाण्याचा सोडा बऱ्या पैकी मिळवावे.
- कढईत तेल गरम करावे आणि पिट्ठी भरून त्रिकोनी स्लाइसला बेसनात डुबवून तळावे.
- सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर नाष्ट्यास गरम गरम वाढावे.
मेथीचे थेपले
- सर्वप्रथम कणीक चाळून घ्यावी. मेथी व कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरावी.
- कणकेत तेल, मीठ घालून सारखी करावी. त्यात सर्व मसाला आणि मेथी, कोथिंबीर घालावी.
- दह्यात गूळ विरघळवून त्यात पीठ घट्ट भिजवाव. गरज वाटली तर पाण्याचा हात लावावा.
- पेढ्याएवढा गोळा करून पुरीसारखे लाटून तव्यावर टाकून शेकावे.
- गरमागरम सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
रगडा पॅटिस
- सर्वप्रथम वाटाणे रात्रभर भिजत घालावेत. सकाळी शिजवतानाच त्यात मीठ, हळद व आवडीप्रमाणे तोडे तिखट घालावे.
- ही उसळ मऊ शिजवून घ्यावी. यात मसाला किंवा घालत नाही. पॅटिससाठी उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत.
- त्यात हिरवी मिरची, लसूण, आले व जिरे वाटून घालावेत. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे.
- हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत.
- नंतर तयार मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट्स करून शॅलो फ्राय करावेत.
- सर्व्ह करताना एका डिशमध्ये दोन पॅटिस घेऊन त्यावर रगडा घालावा. मग त्यावर शेव व आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालाव्यात.
नूडल्स भेळ
- सर्व प्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये क्रिस्पी फ्राईड नूडल्स घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी, थोडे भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली सिमला मिरची, टोमॅटोच्या फोडी घालून
- त्यावर आपण भेळेवर घालतो त्या दोन चटण्या (खजूर, चिंचेची आंबट-गोड चटणी व हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून केलेली तिखट चटणी) घालणे.
- बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवणे.
तिखट आप्पे
- तांदूळ धुऊन वाळवून घ्यावे. नंतर तांदूळ, चणाडाळ, उदीड डाळ, पोहे, मिरी, जिरे हे सर्व कोरडेच भाजावे.
- शेंगदाणे भिजत घालून सोलून मिक्सरमधून जाडसर काढून घ्यावे.
- आप्पे करण्याअगोदर आदल्या दिवशी जरा कोमट पाण्यात पातळसर पीठ भिजवावे. दुसऱ्या दिवशी पिठात मिरच्या, आले वाटून घाला, हळद, हिंग, मीठ, कोथिंबीर घालून चाळवा, शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे घाला
- मग आप्पे पात्रातल्या वाट्यांमध्ये तेल लावून पळीने घालता येईल इतपत पीठ करून वाट्यांमध्ये घाला.
- झाकण ठेवा. पाच मिनिटांनी आप्पे उलटवा. थोडे तेल घाला.
- दोन मिनिटांनी काढा. खाण्याकरिता डाळ्याची चटणी पातळसर करावी व खायला द्या.
- तिखट असल्याने मुले आवडीने खातात.
0 Comments