Rice - भाताचे प्रकार
साहित्य :
अर्धा किलो मटण, बासमती तांदूळ तीन वाटय़ा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, दोन टोमॅटो, दही, लिंबू, तिखट, मीठ, हळद, दोन कांदे, बिर्याणी मसाला.
कृती :
- मटण धुऊन त्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची जाडसर पेस्ट लावून त्यातच दही, लिंबू, बारीक चिरलेले दोन टोमॅटो, तिखट, मीठ, ह़ळद, बिर्याणी मसाला घालून एक तासभर ठेवावे.
- हे सगळे मिश्रण मुद्दाम डायरेक्ट कुकरमध्येच ठेवून द्यावे, कारण बिर्याणी कुकरमध्येच करायची आह.
- तांदूळ धुऊन पंधरा मिनिटं निथळत ठेवावे.
- त्यानंतर एका वेगळ्या पातेल्यात तांदूळ जेमतेम बुडतील एवढे पाणी घालून जरासा मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे उभे चिरून कढईत थोडे जास्त तेल घालून ब्राऊन रंगावर तळून घ्यावे. मग ते बाजूला एका पेपरवर काढून घ्यावे.
- त्याच तेलात हिंग, जिरे, लसूण (बारीक चिरलेली), हळद याची फोडणी करावी. आणि ही फोडणी कुकरमध्ये ठेवलेल्या मिश्रणाला द्यावी. त्यानंतर त्यावर तळलेला कांदा पसरवून घ्यावा.
- त्याच्यावर मोकळा शिजवलेला भात पसरवून घ्यावा.
- यानंतर कुकरची शिट्टी काढून त्या ठिकाणी मळलेल्या कणकेचा गोळा लावून घ्यावा आणि झाकणालाही गोल कणीक लावून घ्यावी. व कुकर मोठय़ा गॅसवर ठेवावा.
- त्याचबरोबर दुसऱ्या शेगडीवर तवाही तापत ठेवावा. कुकर पंधरा-वीस मिनिटे गॅसवर ठेवल्यानंतर वाफ कणीक फोडून आपसूकच बाहेर येऊ लागते.
- ही वाफ बाहेर यायला लागली की कुकर गॅसवरून उतरून तापत असणाऱ्या तव्यावर ठेवावा.
- यानंतर गॅस बारीक करून अर्धा तास शिजू द्यावे. अध्र्या तासाने गॅस बंद केल्यावरही पाच ते दहा मिनिटं वाफ मुरू द्यावी.
- यानंतर कुकर उघडून बिर्याणीचे लेअर्स तांदूळ न तोडता हलक्या हाताने ढवळून घ्यावेत.
0 Comments