साहित्य :
भेंडी - अर्धा किलो कांदे - २ मोठे , हिरव्या मिरच्या २-४, तेल - ४ टेबलस्पून, जिरे - १/२ टीस्पून, लाल तिखट - १ टीस्पून, धणेपूड - १ टेबलस्पून, हळद - १/२ टीस्पून, आमचूर - १/२ टीस्पून, मीठ -चवीनुसार
कृती :
- सर्वप्रथम कांदे सोलून उभे चिरावेत.
- हिरव्या मिरच्या धुवून उभ्या चिराव्यात.
- नंतर भेंडी धुवून, पुसून घ्यावीत व भेंडीचे टोके व देठ काढून दोन इंचाचे तुकडे करून घ्यावे व प्रत्येक तुकडय़ाला मध्ये उभी चीर पाडावी.
- तत्पश्चात कढईत तापवून त्यात जिरे टाकावे.
- ते तडतडले की चिरलेला कांदा टाकून सोनेरी रंग येत तोवर परताव.
- हिरव्या मिरच्या घालून जरा वेळ परतावे.
- त्यात भेंडीचे तुकडे घालून लगेच वरून लाल तिखट, धणेपूड घालावी व नीट मिसळून कढईवर झाकण ठेवून भेंडी शिजू द्यावी.
- अधूनमधून ढवळावे. चवीनुसार मीठ व आमचूर घालावे.
0 Comments