पुरण पोळी
साहित्य :
एक किलो हरभर्याची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप, मिरे पावडर.
कृती :
- हरभर्याची डाळ स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावी.
- गॅसवर 4 लिटर पाणी अल्युमिनियमच्या पातेल्यांत तापायला ठेवावे. पाणी तापल्यानंतर त्यात डाळ घालावी.
- गॅसचा जाळ साधारण ठेवावा. डाळ शिजायला आल्यावर तिला तांबूस रंग प्राप्त होतो. सुगंधही दरवळू लागतो.
- डाळ शिजल्यावर त्यात साखर, बारीक वाटलेली इलायची पावडर, मीरपूड घालावी.
- मिश्रण चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. तयार मिश्रण पुरणवाटप यंत्रातून काढून घ्यावे.
- कणकेची हाताच्या तळव्यावर पातळ चपाती करून त्यात समप्रमाणात पुरण भरावे.
- पुरण भरून झाल्यावर पोळपाटावर हळूवारपणे लाटावे. चमच्याने साजूक तूप सोडून दोन्ही बाजूने पोळी शेकायची.
0 Comments