अनारसे
साहित्य :
तांदूळ, गूळ, तूप, खसखस.
कृती :
- तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला.
- अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढा गूळ किसून पिठात मिसळवून घ्या.
- एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. 3-4 दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते.
- अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात 1/4 साईचे दही गालून पीठ मळा.
- नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या. नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या.
0 Comments